गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 21 ऑगस्ट 2024 (13:18 IST)

अंडी पॅनला चिकटत असतील तर या ट्रिक्सचा वापर करा

नाश्त्यामध्ये लोक अंडी खाणे जास्त पसंत करतात. पण अनेक महिलांची समस्या असते की, अंडी पॅनला  चिकटता. जेव्हा असे होते तेव्हा सर्व पोषक तत्वे देखील नष्ट होतात. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला काही हॅक सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने अंडी जास्त शिजणार नाही आणि पॅनला चिकटणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. 
 
नॉन स्टिक पॅनचा उपयोग करावा-
अंडी बनवण्यासाठी नेहमी नॉनस्टिक पॅनचा उपयोग करावा. यामध्ये अंडी चिकटणार नाही. पण तरी देखील असे होत असेल तर पॅनच्या तापमानाकडे लक्ष्य द्यावे. तसेच प्रयत्न करा की पॅन जास्त गरम व्हायला नको. व गॅस फ्लेम कमी असावी. जर असे केले नाही तर अंडी खालून जळून जातील व वरतून कच्चे राहतील. 
 
मिठाचा उपयोग करावा-
एका पॅन गरम करावा. गरम पॅन मध्ये मीठ घालावे. व त्यावर अंडी ठेवावी असे केल्यास अंडी चिकटणार नाही. 
 
लोण्याचा उपयोग-
अंडीची चव वाढवण्यासाठी व शिजवण्यासाठी तेलाच्या ऐवजी लोण्याचा उपयोग करावा. यामुळे अंडी चविष्ट तर बनतील याचबरोबर जळण्याची शक्यता कमी राहते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik