रविवार, 20 नोव्हेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह शायरी
Written By
Last Modified गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (12:20 IST)

love shayari for boyfriend प्रियकरासाठी प्रेम शायरी

तू कधीच का समजून घेत नाहीस 
कसं रे तुला काही समजत नाही,
साधी सोपी गोष्ट आहे, 
तुझ्याशिवाय मला राहवत नाही...
 
सगळ तुला देवून पुन्हा, 
माझी ओंझळ भरलेली, 
पाहिलं तर तू तुझी ओंझळ, 
माझ्या ओंझळीत धरलेली
 
पाहशील जिथे जिथे नजर उचलून.. 
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू.. 
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..
 
माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण
तू फक्त माझाच व्हावा फक्त एवढच आहे देवाकडे मागण
 
जिथे तू असेल
तिथेच मी असेल
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल
 
तुझ्या आठवणीतला प्रत्येक क्षण
मला जगू देत नाही
आणि मन हे वेडं तुझी
आठवण पडू देत नाही
 
ओढ लागलीय तुझ्या प्रेमाची
सांग साथ मला तू देशील का?
तुझ्यासाठी तोडून आणीन चंद्र, सूर्य आणि तारे
सांग तू माझा होशील का?
 
तुझ्या मिठीत सर्व जग सामावलं आहे 
म्हणून तर मी या जगाचा विचार
करायचं सोडून दिलं आहे