जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली
जेव्हा तिची नि माझी चोरून भेट झाली झाली फुले कळ्यांची, झाडे भरास आली दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले पाण्यात चांदण्यांचे आभाळ सांडलेले कैफात काजव्यांची अन् पालखी निघालीकेसांतल्या जुईचा तिमिरास गंध होताश्वासातल्या लयीचा आवेग अंध होता वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारेस्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारेओथंबला फुलांनी अवकाश भोवताली