रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शनिवार, 26 जून 2021 (08:30 IST)

ब्रेकअप नंतर स्वतःला आठवडीतून काढण्यासाठी या टिप्स अवलंबवा

प्रेमाचे नाते खूप सुंदर आहे. जेव्हा लोक नात्यात असतात तेव्हा ते खूप आनंदी असतात, आपल्या जोडीदाराची काळजी घेतात,या नात्यावर विश्वास ठेवतात.
पूर्वीच्या काळी मुलं मुली एकमेकांना भेटणे तर दूर एकमेकांशी मोकळे पणाने बोलतं देखील नव्हते.परंतु आजच्या युगात सोशल मिडियामुळे हे एकमेकांना भेटतात बोलतात आणि त्यावरच एकमेकांच्या प्रेमात पडतात.परंतु असे बघण्यात आले आहे की या अशा प्रकारचे हे नाते जास्त काळ टिकत नाही.या नात्यात भांडणे,रुसवे-फुगवे होतात.त्यामुळे हे नातं तुटतात.जर आपण या परिस्थितीतून निघत असाल तर या काही टिप्स आपल्यासाठी फायदेशीर आहेत.जे आपली ब्रेकअप मधून निघण्यासाठी मदत करू शकतात.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1  मित्रांसह व्यस्त राहा-आपल्या आयुष्यात मित्र खूप मदत करतात.काही गोष्टी अशा असतात जे आपण आपल्या कुटुंबियांना सांगू शकतं नाही ते आपण मित्रांना सामायिक करतो.जर आपल्याला आपल्या प्रियकराची आठवण येत असल्यास त्या आठवणीतून निघण्यासाठी आपण आपल्या मित्रांसह वेळ घालवू शकता,त्यांच्या सह बोलू शकता,त्यांच्या सह फिरायला जाऊ शकता इत्यादी. 
 

2 कामावर लक्ष केंद्रित करा-आपण कामावर लक्ष केंद्रित केल्याने इकडल्या-तिकडल्या गोष्टीना टाळू शकता.असं बऱ्याच वेळा घडत की आपल्याला आपल्या प्रियकराची आठवण येते.तर अशा परिस्थितीत आपण आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करावे.स्वतःला व्यस्त ठेवावे.असं केल्याने आपल्याला प्रियकराची आठवण येणार नाही.तर त्यांच्या आठवणीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल.
 
 
3 जुन्या आठवणींना पुसून टाका -आपल्याला प्रियकराची आठवण तेव्हा येते जेव्हा आपण त्यांच्या जुन्या आठवणीत गुंतून राहतो.उदाहरणार्थ जेव्हा आपण त्याचा  फोटो आपल्या मोबाईलमध्ये बघतो तेव्हा त्यांची आठवण येणं साहजिक आहे. आपल्याला स्वतःला त्या जुन्या आठवणीतून स्वतःला काढावे लागणार तेव्हा आपण आपल्या प्रियकराला विसरू शकाल.
 

4 सहलीला जाऊ शकता-असं म्हणतात की आपण तणावात असाल,अस्वस्थता जाणवत असल्यास,किंवा एखाद्याची आठवण येत असल्यास सहलीला जावे.या मुळे मनाला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो.या साठी आपण आपल्या मित्रांसह किंवा कुटुंबियांसह सहलीचा बेत आखू शकता.लक्षात ठेवा की आपण सहलीला एकटे जाण्याचा विचार करू नका.कारण या मुळे आपण पुन्हा प्रियकराच्या आठवणीत गुंतू शकता.