शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Updated : बुधवार, 26 मे 2021 (13:57 IST)

लॉक डाउन मध्ये ऑनलाईन मैत्री करताना ही काळजी घ्या

देशात कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे, ज्यामुळे बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाउन सारखे कठोर निर्बंध लावले गेले आहेत. अशा परिस्थितीत लोक घराबाहेर पडू शकत नाहीत. तथापि, सध्याच्या काळात घरातच राहून आपण या व्हायरसपासून आपले संरक्षण करू शकतो. त्याच बरोबर जेव्हा लोक घरी असतात तेव्हा ते आपला बराच वेळ सोशल मीडियावर देखील घालवतअसतात.
सध्या लॉक डाउन मुळे ऑनलाईन मैत्रीचे प्रमाण वाढत आहे. ऑनलाईन मैत्री करताना या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.अन्यथा आपली फसवेगिरी होऊ शकते. चला जाणून घेऊ या. 
 
*   वैयक्तिक माहिती देऊ नका- आपण ऑनलाईन कोणाशी मैत्री करतो तेव्हा आपल्याला त्याच्या बद्दल जास्त काही माहिती नसते. अशा परिस्थितीत आपण आपली वैयक्तिक माहिती दिल्यावर ती व्यक्ती आपल्याला प्रेमाच्या जाळात अडकवून आपला गैरफायदा घेऊ शकते. म्हणून आपली वैयक्तिक माहिती कोणाला ही देऊ नका. 
 
* पैशांचा व्यवहार टाळा -बऱ्याच वेळा ती अनोळखी व्यक्ती गोड बोलून आपल्याला प्रेमाचा जाळ्यात अडकवून पैसे देखील उकळतात.आपण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याचाशी पैशाचा व्यवहार करतो आणि पैसे गमावून बसतो. त्या व्यक्तीला पैसे देण्यापूर्वी तपासून बघा. अन्यथा ती व्यक्ती आपले पैसे घेऊन पळून जाऊ शकते.    
 
* चित्रे आणि व्हिडिओ सामायिक करू नका- असं म्हणतात की प्रेम आंधळं असत. बऱ्याच वेळा लोक प्रेमाच्या आहारी जाऊन असं काही करतात जे त्यांना करायला नको.प्रेमात पडून आपल्या ऑनलाईन मित्राला आपले फोटो आणि व्हिडीओ देखील सामायिक करतात जे करू नये. ती अनोळखी व्यक्ती आपल्या फोटो आणि व्हिडीओचे गैर वापर देखील करू शकते. म्हणून अशी ऑनलाईन मैत्री करताना खबरदारी घ्या. 
 
* अधिक माहिती गोळा करा- जेव्हा आपण लॉक डाउन दरम्यान ऑनलाईन कोणाशी मैत्री करता आणि त्या मैत्रीचे प्रेमात रूपांतरण होते तेव्हा त्या मित्रविषयी अधिक माहिती मिळवा. कदाचित तो आपली फसवेगिरी करत असेल. प्रेम करणे काही चुकीचे नाही, परंतु आपण ज्याच्या वर प्रेम करत आहात ती व्यक्ती चुकीची असू शकते.