नवऱ्याची २१ कर्तव्ये

joke
Last Modified मंगळवार, 19 जानेवारी 2021 (11:46 IST)
०१. कुकरखालचा गॅस तीन शिट्यांनंतर बंद करणे.

०२. उतू जाणाऱ्या दूधाखालचा गॅस धावत जाऊन बंद करणे.
०३. डोअरबेल अॅटेंड करणे.

०४. उंचावरचा डबा काढून देणे.

०५. डब्याचं झाकण उघडून देणे.

०६. सॉसच्या बाटलीचं बुच ओपनरने उघडून देणे

०७. घरात पाल, झुरळ इत्यादी डायनोसरसपेक्षा भयंकर वन्य प्राणी मारुन घराबाहेर टाकणे.

०८. नविन गॅस सिलेंडर शेगडीला लावून देणे.

०९. सांगितलं तरच मुलांना रागावणे, संभाळणे

१०. पेपर आल्यावर लगेच न वाचणे, शब्दकोडं न सोडवणे.
११. "बाहेर पडतच आहात तर" ह्या खतरनाक वाक्यानंतर दिलेल्या यादीनुसार सर्व वस्तू आणणे.

१२. कपडे इस्त्रीला देणे, आणणे. गिरणी वरून दळण दळून आणने

१३. बिलं भरणे, बँक व्यवहार संभाळणे.

१४. महिन्याचं सामान मॉलमधून आणतांना पिशव्या उचलणे, पेमेंट करणे.

१५. शॉपिंग करतांना मॉलमधे तासनतास, निरर्थक, न कंटाळता मागेमागे फिरणे, इशारा होताच चपळाईने पेमेंट करणे.
१६. सासरचे पाहूणे येऊन जाईपर्यंत घरात पडेल ते काम करणे, शहाण्या मुलासारखं वागणे.

१७. घरातली प्लंबिंग, इलेक्ट्रिकची छोटीमोठी कामं करणे.

१८. वारंवार जमिनीवर पडणारा रिमोट, जरासंधासारखा परत-परत जिवंत करणे (दुरुस्त करणे)

१९. घरचं वाहन असेल तर वाहनचालकाची भूमिका न कंटाळता पार पाडणे.

२०. वहान नसेल तर भाड्याची गाडी ऑनलाईन बुक करणे, इत्यादी इत्यादी...
आणि...

२१. माल घरातील सर्व कामे करावी लागतात. एकाची मदत होत नाही' असे वाक्य ऐकून शांत बसणे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा

’भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची घोषणा
कार्तिक आर्यनचा बहुप्रतीक्षित सिनेमा ‘भूलभुलैया-2'च्या प्रदर्शनाची तारीख अखेर जाहीर ...

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान

एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान
एका मंगलकार्यालय वाल्याच आव्हान आमच्याकडे फक्त तुमचा मुलगा आणि मुलगी पाठवा ।। आम्ही ...

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा

एकाच शब्दाचा फरक पण दहशत जाणवणारा
"सकाळी चहा घेताना कप हातातुन निसटला, पण मी तो पडू दिला नाही, हसत बायकोकडे बघत म्हणालो ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम ...

सुहाना खानने पुन्हा तिच्या ग्लॅमरस स्टाईलने इंटरनेटवर धूम केले, फोटो झाले  व्हायरल
सुहाना खान: बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने अद्याप फिल्मी जगात पाऊल ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा ...

सोनाली कुलकर्णी आणि सुमित गुट्टे अभिनीत ‘पेन्शन’ चित्रपटाचा प्रीमिअर २७ फेब्रुवारीला
इरॉस नाऊ ने आज आपल्या ओरिजिनल चित्रपट ‘पेन्शन’ची घोषणा केली असून यात सोनाली कुलकर्णी आणि ...