रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

पापलेट विथ ग्रीन चटणी

साहित्य : एक मध्यम पापलेट, एक स्टील वाटी ओलं खोबरं, एक वाटी चिरलेली कोथिंबीर, एक छोटा आल्याचा तुकडा, 5-6 हिरव्या मिरच्या 7-8 लसूण पाकळ्या, लिंबू, हळद, तिखट, मीठ, तांदळाचा बारीक रवा, मीठ.
 
कृती : सर्वप्रथम पापलेट काट्यापासून दोन्ही बाजूने मसाला भरण्यासाठी कापून घेणे, नंतर स्वच्छ धुऊन आतून, बाहेरून मीठ लावून ठेवणे. खोबरं, आलं, लसूण मिरची, कोथिंबीर वाटून मीठ व लिंबू घालून चटणी तयार करावी. 
 
पापलेटाला आतून बाहेरून हळद, तिखट चोळून घ्यावे. मग पापलेटामध्ये दोन्ही बाजूनं चटणी गच्च भरून तांदळाच्या रव्यातघोळवून घेणे. तवा गरम झाल्यावर तेल घालून पापलेट त्यावर घालून दोन्ही बाजूने गॅस मध्यम ठेवून तळावे.