मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By
Last Modified: गुरूवार, 8 मे 2025 (17:52 IST)

झटपट बनवा Egg Pasta रेसिपी

Egg Pasta Recipe
साहित्य-
१/२ कप -पेने पास्ता 
२ -अंडी 
१ -कांदा
१ -टोमॅटो 
१/४ कप -हिरवी सिमला मिरची 
१/२ टीस्पून -आले-लसूण पेस्ट 
१/२ टीस्पून -लाल तिखट 
१/२ टीस्पून -गरम मसाला 
चवीनुसार मीठ 
१/४ टीस्पून -जिरे 
२ टीस्पून -तेल 
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात जिरे घाला. यानंतर, चिरलेला कांदा घाला आणि चांगला परतून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या. यानंतर, चिरलेले टोमॅटो घाला आणि पुन्हा एकदा चांगले परतून घ्या. आता पॅनमध्ये लाल तिखट, मीठ आणि गरम मसाला घाला, चांगले मिसळा आणि टोमॅटो वितळेपर्यंत परतून घ्या. अंडी फेटून घ्या. अंडी तळताना त्यात चिरलेली सिमला मिरची घाला आणि चांगले मिसळा. अंडी पूर्णपणे तळलेली दिसू लागली की, शिजवलेला पास्ता घाला आणि मसाल्यांमध्ये चांगले मिसळा.आता गॅस बंद करा. चला तर एग पास्ता तयार आहे. गरम सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik