शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. मांसाहारी
Written By

कुरकुरीत सुरमई फ्राय Crispy Surmai Fish Fry

Vanjaram fish fry
साहित्य : १/२ kg सुरमई, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद पावडर, १/४ चमचा ओवा, २ चमचे लिंबाचा रस, ३ चमचे तांदळाचं पीठ, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, मीठ चवीप्रमाणे, शेलो फ्रायसाठी तेल
 
कृती : माशाचे आपल्या आवडीप्रमाणे तुकडे करा. माशाला आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, लिंबूरस, ओवा, मीठ लावून १ तास मॅरीनेट करण्यासाठी ठेवा.मॅरीनेट केलेल्या माशाचे तुकडे तांदळाच्या पिठात घोळा. एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि तुकडे शेलो फ्राय करून घ्या. ५ मिनिटानंतर त्यांना उलटून दुसर्‍या बाजूने देखील फ्राय करून घ्या. दोन्ही बाजू खरपूस भाजल्यावर जास्तीचे तेल टिशू पेपरने टिपून घ्या. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.