साहित्य : 500 ग्रॅम बासमती तांदुळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा, १२५ ग्रॅम कोबी, पातीचा कांदा, २ गाजर, १/२ कप उकळलेले मटरचे दाणे, १०-१५ मश्रुमचे तुकडे, १/२ पॅकेट सुपर सिजनिंग, २ मोठे चमचे सोया सॉस, अजीनोमोटो, २ मोठे चमचे रेड चिली सॉस, २५० ग्रॅम चिकनचे तुकडे, तळण्यासाठी तेल, २ सिमला मिरची.
कृती : कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यात सर्व भाज्या व मटरचे दाणे घालून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे, २ मोठे चमचे सोया सॉस, २ मोठे चमचे चिली सॉस, १/२ पॅकेट सुपर सिजनिंग, मश्रुमचे तुकडे, चवीनुसार अजीनोमोटो घालून एकजीव करावे.
नंतर त्यात शिजलेला भात घालून चांगले कालवून घ्यावे. गरम गरम पुलाव टोमॅटो सॉस व चिली सॉस सोबत सर्व्ह करावे.