साहित्य : 500 ग्रॅम चिकन, 200 ग्रॅम तूप, 200 ग्रॅम दही, 200 ग्रॅम कांदे, 100 ग्रॅम आलं, 1/2 वाटी गरम मसाला, 3/4 चमचा मीठ, दोन लहान चमचे तिखट, तीन लहान चमचे धने पूड, 4-5 ताम्रपत्रे.
कृती : एक कांदा कापून तूपात सोनेरी होईस्तोर परतून घ्या. त्यात धुतलेले चिकनचे तुकडे टाकून चांगल्याप्रमाणे परतावे व तुपात तळावे. बाकी उरलेले कांदे, आलं, तिखट व धने पूड यांना वाटून घ्यावे. गरम तूपात ताम्रपत्रे व गरम मसाला टाकावा. त्यात वाटलेला कांदा घालून चांगले परतून घ्यावे. कांदे भाजून झाल्यावर त्यात दही टाकून परत परतावे. नंतर त्यात परतलेले चिकन व मीठ घालून एकजीव करावे. 1/2 ते 2 वाटी पाणी घालून 10 मिनिट कुकरमध्ये शिजवावे. गरम गरम चिकन कोरमा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.