शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|
Last Modified: सांगली , सोमवार, 30 मे 2011 (10:55 IST)

कथाकार चारुता सागर यांचे निधन

ग्रामीण कथालेखक चारुतासागर (८०) यांचे रविवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मागच्या आठवड्यात त्यांना सांगलीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

दिनकर दत्तात्रय भोसले उर्फ डी. डी. गुरुजी यांनी 'चारुतासागर' या टोपण नावाने लेखन केले. प्राथमिक शाळेतील शिक्षक ते साहित्यिक असा अतिशय खडतर प्रवास त्यांनी केला. त्यांच्या 'नागीन' या कथासंग्रहाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांची 'दर्शन' ही कथा लोकप्रिय झाली. याच कथेवर 'जोगवा' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातील अनेक प्रसंग बेतले आहेत.