कलियुगातील परमेश्वराचे निवासस्थान
वैशिष्ट्यपूर्ण शबरीमाला मंदिर
शबरीमाला मंदिर हे एक जगप्रसिद्ध मंदिर असून येथे प्रभू अय्यप्पांचे निवासस्थान आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मक्का-मदिनेनंतर जगातील दुसर्या क्रमांकाचे तीर्थस्थान म्हणून शबरीमाला मंदिर ओळखले जाते. दरवर्षी करोडो भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. मागील वर्षीच्या आकेडीवारीवर नजर टाकली तर असे दिसून येते की नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान पाच कोटी भाविकांनी या मंदिराला भेट दिली आहे.केरळ आणि तामिळनाडूच्या सीमेवरील पश्चिम घाटाच्या पर्वतरांगेवर हे मंदिर आहे. याला दक्षिण भारतातील प्रमुख तीर्थस्थानाचा दर्जा दिलेला आहे. हे मंदिर पूणकवन नावाच्या 18 पर्वतरांगा आणि
चोहोबाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेले आहे. असे सांगितले जाते, की महर्षी परशुरामाने शबरीमालेवर भगवान अय्यप्पाच्या साधनेसाठी त्यांची मूर्ती स्थापन केली होती.प्रभू अय्यप्पा यांना भगवान शिव आणि विष्णूचा पुत्र मानले जाते. भगवान विष्णूच्या मोहनी अवतारात त्याच्या रूपावर भोलेनाथ आसक्त झाले होते. त्यांच्या रासलीलेमुळेच भगवान अय्यप्पांचा जन्म झाला असेही सांगितले जाते.मंडलपूजा (15 नोव्हेंबर) आणि मकराविलक्कू (14 जानेवारी) हे शबरीमालेचे प्रमुख उत्सव आहेत. मळ्याळम पंचांगाच्या (माह) पाच दिवस अगोदर आणि शिशू माह (एप्रिल महिन्यात) या मंदिराचे दरवाजे उघडले जातात. अन्यथा वर्षभर दरवाजे बंद असतात.
या दिवशी भाविक प्रभू अय्यप्पाच्या मूर्तीला तुपाने अभिषेक घालतात. येथे येणार्या प्रत्येक भाविकाला 'स्वामी तत्वमसी' या नावाने संबोधले जाते. या संबोधनाचा अर्थ संस्कृत सूक्त 'अहं ब्रम्हास्मि' होय. अर्थात येथे येणारा भक्त स्वत:ला देवाचे अभिन्न रूप मानत असतो.सर्वात महत्त्वाची पूजा म्हणजे 'मकराविलक' होय! या पूजेच्या शेवटी भाविक पर्वताच्या शेंड्यावर आकाशात पसरलेल्या पवित्र 'मकरज्योती' चे दर्शन घेतात. येथे येणार्या भाविकाला काही विशेष गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जसे मंडलपूजेदरम्यान 41 दिवसांचे विविध उपवास ठेवावे लागतात. शिवाय तामसी प्रवृत्ती आणि मांसाहारापासून दूर रहावे लागते.फोटो गॅलरी बघण्यासाठी येथे क्लिक करा...