रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. धर्मयात्रा
  3. धर्मयात्रा लेख
Written By Author वेबदुनिया|

देवासची चामुंडा आणि तुळजा देवी

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला मध्य प्रदेशातील देवासच्या टेकडीवरील प्रसिद्ध देवीचे दर्शन घडवणार आहोत. देवी भवानीचे हे मंदिर प्रसिद्ध आहे. खरे तर इथे दोन मंदिरे आहेत. मोठ्या देवीला तुळजा भावानी आणि लहान देवीला चामुंडा देवीचे रूप मानले जाते. 

येथील पुजारी सांगतात, की या दोन्ही देवी बहिणी आहेत. एकदा दोघींमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून वाद झाला. वादाने दुःखी होऊन दोघीजणी आपले स्थान सोडून जायला लागल्या. मोठी देवी पाताळात शिरायला लागली आणि लहान देवी टेकडी सोडून जायला निघाली. संतापलेल्या या दोघींना पाहून त्यांचे साथीदार (असे मानले जाते की हनुमान मातेचा ध्वज घेऊन पुढे आणि भैरूबाबा कवच बनून मागे चालत होते.) हनुमान आणि भैरूबाबाने त्यांचा रांग शांत करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत मोठ्या देवीचे अर्धे शरीर पाताळात गेले होते ती त्याच अवस्थेत टेकडीवर थांबली. लहान देवी टेकडीवरून खाली येत होती आणि रस्ता बंद झाल्याने ती क्रोधित झाली. ज्या अवस्थेत ती खाली उतरत होती त्याच अवस्थेत ती टेकडीवर थांबली.

म्हणून आजही दोन्ही देवी त्याच स्वरूपात येथे आहेत. इथल्या लोकांच्या मते, या दोन्ही देवी स्वयंभू व जागृत आहे. येथे केलेले नवस पूर्ण होतात. देवासबाबत आणखी एक बाब सांगितली जाते. एक म्हणजे देवासमध्य दोन वंश राज्य करीत होते. एक होळकर राजवंश आणि दुसरे म्हणजे पवार वंशाची कुलदेवी.

  WD
टेकडीवर दर्शन करण्यासाठी येणारे भाविक दोन्ही देवींबरोबरच भैरूबाबाचे दर्शन करायला विसरत नाही. नवरात्राच्या वेळी येथे दिवसरात्र लोक येत असतात. या दिवसात येथे मातेची विशेष पूजा करण्यात येते.

पोहचण्याचा मार्ग
हवाई मार्ग - येथून जवळचे विमानतळ म्हणजे मध्य प्रदेशची औद्योगिक राजधानी असलेले इंदूर आहे.
रस्ता मार्ग - हे शहर मुंबई- आग्रा महामार्गाजवळ आहे. हा रस्ता देवीच्या टेकडी जवळूनच जातो. इंदूरपासून देवास 30 किलोमीटरवर आहे. इंदूरहून आपण बस किंवा टॅक्सीने देवासला जाऊ शकतो.
रेल्वे मार्ग - इंदूरहून देवासला रेल्वेद्वारे जाऊ शकता