बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By भीका शर्मा|

बडोद्यातील काशी विश्वनाथ मंदिर

धर्मयात्रेमध्ये या भागात आम्ही आपल्याला गुजरातमधील बडोदा शहरातील काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन घडविणारं आहोत. हे मंदिर अतिप्राचीन असून याची स्थापना 120 वर्षांपूर्वी सयाजीराव गायकवाड महाराजांच्या शासनकाळात झाली होती.

कालांतराने हे मंदिर स्वामी वल्लभरावजी महाराजांना दान करण्यात आले. स्वामी वल्लभरावजींनंतर स्वामी चिदानंद सरस्वती यांनी मंदिराच्या देखरेखीची जबाबदारी आपल्या हातात घेतली. त्यांनी 1948 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. चिदानंदजी स्वामीच्या मृत्यूनंतर हे मंदिर ट्रस्टच्या हाती गेले. आता मंदिराची देखरेख ट्रस्टचे कर्मचारी करीत आहे.

WD
काशी विश्वनाथ मंदिर हे गायकवाड महाराजांच्या राजवाड्याच्या समोर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय सुंदर व नक्षीदार आहे. मुख्य द्वाराने प्रवेश केल्यानंतर काळ्या दगडांनी बनलेली नंदीची सुंदर मूर्ती आहे. नंदीसोबतच सौभाग्याचे प्रतीक कासवाची प्रतिमा आहे. नंदीची प्रतिमेच्या एकीकडे स्वामी वल्लभ रावजी व दुसरीकडे स्वामी चिदानंदची पाषाण प्रतिमा आहे.

मुख्य मंदिर दोन भागात विभाजित केले गेले आहेत. पहिल्या भागात एक मोठा हॉल आहे. त्यात भाविक सत्संग व पूजेसाठी एकत्रित होतात. दुसर्‍या भागात मंदिराचा गाभारा आहे. सत्संग भवनाच्या स्तंभांवर व मंदिराच्या भिंतींवर वेग वेगळ्या देवीदेवतांच्या सुंदर व आकर्षक मूर्ती आहे‍त.

मंदिरचा गाभारा पांढर्‍या संगमरमरने बनला आहे. गाभार्‍याच्या मधोमध शिवलिंगाची स्थापना केली गेली आहे. शिवलिंगाच्या आधारावर चांदीचा मुलामा आहे. पण येथे भक्तांचा प्रवेश नाही. शिवलिंगावर पाणी, दूध इत्यादी वाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात काशी विश्वनाथ, हनुमान मंदिर व सोमनाथ महादेवाचे मंदिर आहे. एका लहान मंदिरात स्वामी चिदानंद सरस्वतींच्या पादुका ठेवण्यात आल्या आहे.

श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी व शनिवारी येथे भाविकांची गर्दी होते. शिवरात्रीच्या दिवशी गर्दी जास्त असते. मंदिरात तीर्थयात्री व साधू-संतांना राहण्याची व भोजनाची उत्तम सोय ट्रस्टतर्फे केली जाते.

कसे जाल?
रस्ता मार्ग : बडोदा हे गुजरातची राजधानी गांधीनगरहून 115 व अहमदाबादहून किमान 130 किमी दूर आहे.

रेल्वेमार्ग : बडोदा हे पश्चिम रेल्वेच्या दिल्ली-मुंबई रेल्वेमार्गावर प्रमुख स्टेशन आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून बडोद्यासाठी रेल्वेसेवा आहे.

हवाईमार्ग : बडोदा येथे विमानतळ आहे. शिवाय अहमदाबादला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.