शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

पावसाळ्यात झाडांची निगा

या दिवसात झाडांसाठी शक्यतो नैसर्गिक खत वापरावं. सुकलेलं शेणखत उत्तम यार्य आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडाच्या मुळाशी शेणखत घाला. रासायनिक खतांचा वापर पावसाळ्यात आवर्जन टाळा. शक्य असल्यास झाडांच्या कुं‍डीतली माती बदला. त्यात नवीन माती वापरा.

WD


पावसाळ्यात पाण्याची अजिबात कमतरता नसते. अशा वेळी झाडांची विशेष काळजी घ्या. अतिरिक्त पाणी वाहून जाईल याची विशेष काळजी घ्या. कारण झाडांच्या मुळात पाणी साचून राहून झाडं कुजण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पाण्याचा निचरा योग्य रीतीने होईल अशा कुंड्यांचा उपयोग झाडं लावण्यासाठी करावा.
WD


बागेत नव्याने झाडं लावायचा विचार करत असाल तर या पावसाळ्यात ओवा, आंबेहळद, अळू लावायला अजिबात विसरू नका. श्रावणात या भाज्या नक्की उपयोगी पडतील.

WD


पावसात फुलांमध्ये गुलाब, जाई, जुई, मोगरा, तेरडा, लिली ही फुलझाडं लावण्यास काहीच हरकत नाही. या फुलांना पावसात चांगला बहर येतो. सुगंध आणि रंगाची छान जोड बगीच्याला मिळेल.