गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (09:40 IST)

होळी विशेष यंदा असा साजरा करा होळीचा सण,अवलंबववा या टिप्स

सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव सगळीकडे वाढतच आहे. या कोरोनाच्या काळात आपण होळीच्या सणाला अशा पद्धतीने साजरा करून अविस्मरणीय बनवा. होळी रंगांचा सण आहे, या सणाला लोक दणक्यात आणि उत्साहात साजरा करतात.परंतु यंदा कोरोना असल्याने काही सावधगिरी बाळगावी लागेल. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत की आपण यंदाची होळी कशी साजरी करावी. 
 
* रंगानी नव्हे तर फुलांनी होळी खेळा-
बरेच लोक असं मानतात की होळीचा सण रंगाशिवाय अपूर्ण आहे. परंतु यंदा आपण कोरोनामुळे होळी रंगांच्या ऐवजी फुलांनी खेळू शकता. या मुळे रायायनिक रंगाचा त्रास देखील होणार नाही. आपण नैसर्गिक फुलांचा वापर करून होळी खेळू शकता. 
 
* ऑर्गेनिक रंगांचा वापर करा- 
आपल्याला होळी रंगांनीच खेळायची आहे तर या साठी आपण ऑर्गेनिक  रंगांचा वापर करू शकता.आपल्या स्वयंपाकघरात असे बरेच पदार्थ आहे ज्यांचा वापर आपण रंग बनविण्यासाठी करू शकतो. हे हानिकारक देखील नसणार रंग बनविण्यासाठी आपण हळद,मेंदी पावडर,आणि चंदन पावडरचा वापर करू शकता. 
 
* होळी वर एकमेकांना टीळा लावा- 
यंदाच्या होळीवर आपण एखाद्याला गळाभेट देण्याऐवजी टीळा लावू शकता. या मुळे आपण सामाजिक अंतर देखील राखू शकाल.  
 
* खाद्य पदार्थांवर भर द्या- 
रंगाशी खेळण्या ऐवजी आपण खाद्य पदार्थांचा अधिक आनंद आणि आस्वाद घ्यावा. जेणे करून रंगांचा काहीच त्रास होणार नाही आणि कोरोनाच्या संसर्गापासून बचाव देखील होऊ शकेल.