उन्हाळ्यात अन्न नीट साठवा
उन्हाळ्यात सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो अन्न साठवण्याचा. उष्णतेमुळे अन्नातली पोषक द्रव्यं नष्ट होतात. त्यामुळे उरलेलं अन्न हवाबंद डब्यात किंवा कंटेनरमध्ये ठेवायला हवं. अन्न उघड्यावर ठेवल्यास खराब होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. अन्नाचा रंगही बदलतो आणि जीवनसत्त्वं उडून जातात.
* उष्णता, हवा आणि दमटपणापासून अन्न दूर ठेवा.
* भाज्या उघड्यावर ठेवल्यास त्यातली पोषकद्रव्यं, महत्त्वाची जीवनसत्त्वं नष्ट होतात. भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना हवाबंद कप्प्यात ठेवा.
* शिजवलेलं मांस फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवल्यास चार ते पाच दिवस सहज टिकतं.
* फळं न धुता फ्रीजमध्ये ठेवा. चार दिवस सहज टिकतील.
* ब्रेड हवाबंद डब्यात फ्रीजरमध्ये ठेवा. खाण्याच्या 15 मिनिटाआधी बाहेर काढून ठेवा.
* मासे जास्त काळ साठवून ठेवायचे असतील तर हवाबंद डब्यात ठेवा.
* आंब्याचा रस काढून हवाबंद डब्यात साठवून ठेवल्यास कधीही काढून खाताना फ्रेश वाटेल.