शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2020 (08:37 IST)

जुनी बेडशीट देखील कामी येते

प्रत्येक घरात एक वस्तू सापडते आणि ती म्हणजे बेडशीट किंवा चादर. मग ती सिंगलबेड असो किंवा डबलबेड. जर बेडवर चादर अंथरली नाही तर काही तरी अपूर्ण असल्यासारखे दिसते. एवढेच नव्हे तर आजकाल अनेक प्रकारच्या रंगांच्या आणि डिझाइनच्या चादरी बाजारपेठेत मिळतात. परंतु काही काळानंतर बेडशीट जुनी झाल्यावर पलंगावर अंथरल्याने ती जुनाट आणि फिकट दिसू लागते. नंतर ती बेडशीट पलंगावर अंथरण्याची इच्छाच होत नाही. हे शक्य आहे की आपल्या घरात देखील अशा काही जुन्या चादरी असतील. आपण अशा जुन्या चादरींना फेकण्याचा ऐवजी चांगल्या प्रकारे वापरू शकता. चला तर मग जाणून घेऊ या बद्दल ची माहिती.
 
* शॉपिंग बॅग बनवा - 
सध्याच्या दिवसात प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरण्याची मनाई आहे त्यांच्यावर प्रतिबंध लावले आहेत. अशा परिस्थितीत जुन्या चादरीच्या मदतीने शॉपिंग बॅग बनविण्याचा विचार चांगला आहे. या मुळे आपल्याला घरासाठी सामान आणण्यासाठी सोपे होईल. एवढेच नव्हे, कापडी असल्यामुळे ते धुऊन निर्जंतुक देखील केले जाऊ शकते. सध्याच्या काळात हे अधिक सुरक्षित आहे.
 
* किचन क्लीनिंग -
स्वयंपाकघरातील काउंटर टॉप आणि इतर स्वच्छता करण्यासाठी किचन टॉवेल्स ची गरज असते. जर आपल्या घरात जुनी चादर आहे तर आपल्याला किचन टॉवेल्स विकत घेण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण चादरीला चौरस किंवा आयताकृती आकारात कापून त्याचे कोपरे दुमडून शिवून घ्या. आपण हे स्वयंपाकघरात स्वच्छतेसाठी वापरू शकता.
 
* पाळीव प्राण्यांसाठी बेड बनवा- 
आपल्याला आपल्या पलंगावर जुनी चादर वापरायची इच्छा नसल्यास आपण ते आपल्या पाळीव प्राणींच्या बेडवर वापरू शकता. या मुळे त्यांना देखील सोपे होईल.
 
* रजईचे कव्हर बनवा -
जुन्या चादरीला पलंगावर वापरण्या ऐवजी त्याच्या मदतीने रजई किंवा ब्लॅंकेटचे कव्हर बनवू शकता. या साठी आपण बऱ्याच बेडशीट चा वापर करू शकता. या शिवाय बेडशीट किंवा चादरीच्या साहाय्याने पॅचेस बनवून एकत्ररित्या शिवून घ्या. हे एक अतिशय आकर्षक रंगीत रजई कव्हर बनू शकतो, जे दिसायला छान दिसतो.
 
* हीटिंग पॅड -
आपल्याला माहित नसेल पण जुन्या चादरी पासून हीटिंग पॅड देखील बनविले जाऊ शकते. या साठी आपण चादरीला एकाच आकारा मध्ये दोन भागात कापून घ्या आणि नंतर त्याला शिवून घ्या. त्याला एका बाजूने उघडे ठेवा. आता या मध्ये आपण तांदूळ किंवा सोयाबीन्स घाला आणि शिवून घ्या.