बुधवार, 29 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (14:43 IST)

Fast House Cleaning Tips परिश्रम आणि वेळ वाचेल

उत्तम आरोग्यासाठी स्वच्छता राखणे आणि त्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचे आहे. पण जेव्हा गोष्ट घराच्या स्वच्छतेची येते तर अक्षरशः घाम येतो. घराची स्वच्छता करणे डोकेदुखी पेक्षा कमी नाही. घराच्या स्वच्छतेमध्ये संपूर्ण वेळ निघून जातो. त्यासाठी वेळ आणि परिश्रम दोन्ही लागतात. अशा परिस्थितीत आपले काम सोपे होण्यासाठी आम्ही काही क्लीनिंग टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपला वेळ आणि मेहनत दोन्ही वाचू शकतील. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* पंखा उशीच्या साहाय्याने स्वच्छ करा- 
जर आपल्या घरात जुन्या उशा असतील तर त्यांना फेकू नका हे आपल्या कामी येतील. सहसा आपण छतावरील पंखे पुसण्यासाठी कापड किंवा साबणाचा घोळ वापरण्यात आणतो. जर आपण लवकर काम पूर्ण करण्याचे इच्छुक असाल तर ही जुनी उशी आपल्या कामी येईल. हे पंख्याच्या पात्यावर घासून परत ओढा सर्व धूळ खाली पडेल. काम पूर्ण झाल्यावर उशी झाडून स्वच्छ करा. हे घरामध्ये हार्ड−टू−क्लीन क्षेत्र म्हणजे अशे ठिकाण स्वच्छ करेल जे स्वच्छ करणं अवघड असतात.
 
* लिंबाच्या रसाचा वापर - 
आपणास आपल्या मायक्रोव्हेवची स्वच्छता कोणतेही त्रास न होता करू इच्छिता तर या साठी लिंबाचा वापर करू शकतो. या साठी आपण मायक्रोवेव्हच्या बाउल मध्ये लिंबू ठेवून त्यावर उकळते पाणी घाला आणि 5 मिनिटे मायक्रोव्हेव चालवा. त्यात आलेली वाफ घाणीच्या कणांना सैल करेल जेणे करून आपण या मधील डाग सहजपणे काढू शकाल. तसेच, लिंबामुळे, आपल्या मायक्रोव्हेव मधून एक सुगंध देखील येईल.
 
* बेकिंग सोडा कामी येईल -
घराच्या स्वच्छतेची गोष्ट असते तेव्हा बेकिंग सोडा खूप उपयुक्त ठरतो. आपण हे बऱ्याच पद्धतीने वापरू शकता. जसे की आपल्या स्वयंपाकघराचे सिंक अवरोधित झाले असल्यास आपण बेकिंग सोड्याची मदत घ्या. आपण मोरीमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर सम प्रमाणात घाला, त्याला एखाद्या कपड्याच्या साहाय्याने बंद करून द्या. अर्ध्या तासानंतर यामध्ये गरम उकळते पाणी घाला आपण बघाल की अवरोधित झालेली मोरी व्यवस्थित काम करत आहे. या व्यतिरिक्त, बेकिंग सोडाच्या साहाय्याने गंज देखील काढू शकता. यासाठी आपण बेकिंग सोड्यात थोडंसं पाणी घालून एक पेस्ट तयार करा. नंतर गंज लागलेल्या भागावर लावून 15 -20 मिनिटे ठेवा नंतर पाण्याने धुऊन घ्या आणि कपड्याने पुसून घ्या.