सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 21 डिसेंबर 2020 (11:37 IST)

सोन्याचे दागिने घरात स्वच्छ करता येतात, सोपी पद्धत जाणून घ्या

स्त्री आणि दागिने ह्यांचा जणू एक अतूट नातं आहे. सामन्यात: स्त्रियांकडे दागिन्यांचा एक मोठा संग्रहच असतो त्यामध्ये सोन्याचे दागिने असणे साहजिकच आहे. सध्याच्या काळात वेगवेगळ्या प्रकारांच्या दागिन्यांचा कल जरी वाढला आहे तरी ही सोन्याचे दागिने सदाहरित आहे आणि सोन्याच्या दागिन्यांचा मोह कोणाकडून देखील आवरला जात नाही. दैनंदिन जीवनापासून ते एखाद्या विशिष्ट प्रसंगासाठी बायका सोन्याचे दागिने स्वतंत्ररीत्या बनवतात. पण एखाद्या काळानंतर सोन्याची चमक फिकट होऊ लागते आणि ते घालावेशे वाटत नाही. दागिने स्वच्छ करण्यासाठी त्या सोनाराकडे जातात. या मध्ये आपले बरेच पैसे तर खर्च होतातच त्यासह मनात भीती असते की सोनार दागिन्यांशी काही गडबड तर करणार नाही. जेणे करून आपले नुकसानच होईल. जर आपण याच भीतीमुळे दागिने बाहेर स्वच्छ करवून घेत नसाल तर आम्ही इथे सांगत आहो काही सोप्या युक्त्या. ज्यांचा अवलंब करून आपण घरातच सोन्याचे दागिने उजळवू शकता.
 
दागिने असे स्वच्छ करा- 
घरात दागिने स्वच्छ करण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची गरज लागेल एक मोठा वाडगा, मायक्रोफायबर कापड, सौम्य डिश वॉश साबण, टूथब्रश.
 
पद्दत -
सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी वाडग्यात चार कप कोमट पाणी घाला. यामध्ये एक चमचा सौम्य डिश वॉश साबण मिसळा. नंतर आपल्या सोन्याच्या दागिन्यांना या पाण्यात घाला आणि एक तास तसेच सोडा. एका तासा नंतर दागिने काढून जुन्या टूथब्रशच्या साहाय्याने घासून काढा. या मुळे दागिन्यावरील घाण निघून जाईल आणि दागिने स्वच्छ होतील.
 
आता एक दुसरा वाडगा घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी घाला. या नंतर आपण स्वच्छ केलेले दागिने बुडवून स्वच्छ करा. असं केल्याने दागिन्यांवर लागलेले साबण चांगल्या प्रकारे निघून जाईल आणि दागिने स्वच्छ होतील. आता एक मायक्रोफायबर कापड घ्या आणि त्याच्या साहाय्याने दागिने पुसून घ्या.
 आपण बघाल की आपले सोन्याचे दागिने उजळून निघाले आहे.