वेळेवर पीरियड येत नाहीत? तर आहारात या 7 गोष्टींचा समावेश करा  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  बर्याच वेळा असे घडते की वेळेवर मासिक पाळी येत नाही. अशा परिस्थितीत सतत वेदना होत जाणवतात. कधीकधी पीरियड क्रम्प 
				  													
						
																							
									  
	 
	अधिक वेदना देऊ लागतात. अशा परिस्थितीत, कोणतेही औषध घेण्याऐवजी, आपण घरगुती उपचार आणि अन्नाकडे लक्ष दिले पाहिजे-
				  				  
	 
	ओवा 
	6 ग्रॅम ओवा 150 मिली पाण्यात उकळवा आणि दिवसातून तीन वेळा प्या. याशिवाय दोनदा ओव्याचा चहा प्या.
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	 
	जीरं
	जिर्याची तासीर गरम असते. याचा प्रभाव देखील ओव्यासारखा पडतो.
	 
	कच्ची पपई
				  																								
											
									  
	कच्ची पपई खाल्ल्याने पीरीयड्स येण्यास मदत होते. पपईत असे घटक आढळतात जे गर्भाशयाच्या आकुंचनास कारणीभूत ठरतं. आकुंचनामुळे पीरियड्स येतात. कच्च्या पपईचं ज्यूस तयार करुन पिण्याने किंवा पपई खाल्लयाने फायदा होतो.
				  																	
									  
	 
	मेथीदाणा
	मेथीदाणा पाण्यात उकळून प्यावा. हा उपाय अनेक तज्ञांनी देखील सुचविला आहे.
				  																	
									  
	 
	डाळिंब
	आपण नियमित वेळेच्या 15 दिवसांपूर्वीपासून दिवसातून 3 वेळा डाळिंबाचं ज्यूस पिणे सुरु करावं. याने मासिक पाळी वेळेवर येते.
				  																	
									  
		तीळ
		तीळ नियमित तारखेच्या 15 दिवसाआधीपासून वापरावे. हे गरम असतात म्हणून अधिक सेवनामुळे नुकसान झेलावं लागू शकतं. तिळाचे दाणे दिवसातून दोन ते तीन वेळा मधासोबत घेऊ शकता.
 				  																	
									  
		 
		सिट्रस फ्रूट्स
		लिंबू, संत्रा, किवी, आवळा या सारखे फळं ज्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं त्याचं सेवन करावं. याने प्रोजेस्टेरॉन लेवेलमध्ये वाढ होते जे जो पीरियड इंड्यूस घेणारा हार्मोन आहे.