मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 22 मार्च 2021 (12:17 IST)

स्त्रीच आरोग्य सांभाळतो गजरा

गजरा, old fashioned म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत...गजरा हा शब्द उच्चारला तरी कसं आल्हाददायक वाटतं. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रीया आजही रोज गजरा माळल्या शिवाय नोकरीला जात नाहीत..
 
गजरा - सौंदर्य हा संबंध सर्वश्रुत आहेच. सध्या तीव्र उन्हाळा सुरु आहे. पण निसर्गात पाहिल तर मोगरा, चाफा, बकुळ यांना बहर आला आहे. काळजी आहे निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे..
 
आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो. अर्थातच फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.
 
स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या pituitary gland च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलाच्या वास नाकाद्वारे जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथी चे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रीयां मधील संतुलन रहाण्यास मदत होते..
 
मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रीयांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण concentration, motor development करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत. फुलांच्या वर आधारित चिकित्साच आहेत..
पण कसंय... घर की मुर्गी....
 
भरगच्च पैसे देऊन अरोमा थेरपी घेऊ पण गजरा माळून old fashioned होणार नाही. 
 
-सोशल मीडिया