मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (21:07 IST)

Summer Trekking Tips: उन्हाळ्यात ट्रेकिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा

Summer Trekking Tips in Marathi while trekking ट्रेकिंग  Tips in summer Keep these things in mind Summer Trekking Tips In Marathi summer madhye trekking kartana lakshat thewaycha tips   Sakhi Marathi Saptarang Marathi Lifestyle Marathi
Summer Trekking Tips प्रवासाची आवड असलेले तरुण केवळ ठिकाणच शोधत नाहीत तर काही उपक्रमांद्वारे त्यांची सहल संस्मरणीय बनवू इच्छित असतात. अशा परिस्थितीत, मित्र किंवा गट असलेल्या लोकांना अशा ठिकाणी जायला आवडते, जिथे ते साइटवर फिरताना रोमांचक क्षणांचा आनंद घेऊ शकतात. 
 
काही लोक डोंगराळ ठिकाणी ट्रेकिंग, बंजी जंपिंग, पॅराग्लायडिंग, माउंटन बाइकिंग इत्यादींचा आनंद घेऊ शकतात, तर समुद्र किंवा पाण्याच्या ठिकाणी भेट देऊन रिव्हर राफ्टिंग, काईट सर्फिंग, बनाना राईड, स्नॉर्कलिंग, पॅरासेलिंग आणि पॅराग्लायडिंग आणि स्कूबा डायव्हिंग इत्यादींचा आनंद घेतात. पण या मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ट्रेकिंग आहे. काही लोक ट्रेकिंग कधीही जाणे पसंत करतात. पण उन्हाळ्यात ट्रेकिंग करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा. 
 
1 बॅगेत जास्त सामान नसावे -
ट्रेकिंगला खूप मेहनत घ्यावी लागते. तुम्ही जी बॅग घेऊन जात आहात, ती जर जड असेल तर ट्रेकिंग करायला जास्त त्रास होतो. उन्हाळ्यात जड बॅग घेऊन ट्रेकला जाऊ नका. त्यापेक्षा उष्णतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आणि आवश्यक अशाच वस्तू बॅगमध्ये ठेवा. तसेच पोर्टेबल चार्जर, बॅग भिजण्यापासून वाचवण्यासाठी प्लास्टिकची पिशवी ठेवा. आवश्यक औषधे ठेवा.
 
2 ट्रेकिंग दरम्यानचे अन्न-
ट्रेकिंगला जाताना जंक फूड खाण्याऐवजी असे पदार्थ घ्या की ज्यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. तसेच उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या टाळा. यासाठी फळे, सॅलॅड, कच्चे तांदूळ ठेवू शकता. कच्चा तांदूळ चघळल्याने ऊर्जा मिळते, तहान कमी लागते आणि भूक लवकर लागत नाही.
 
3 पाण्याची बाटली ठेवा-
ट्रेकिंगसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. ट्रेकिंग दरम्यान तहान लागणे सामान्य आहे. त्यामुळे पाण्याने भरलेली बाटली ठेवा. सर्व पाणी एकाच वेळी पिऊ नका, परंतु तुम्ही थोड्या अंतराने पाणी पिऊ शकता. लिंबूही पाण्यासोबत ठेवू शकता. लिंबू पाणी तुम्हाला डिहायड्रेशन होण्यापासून प्रतिबंधित करते आणि ऊर्जा देते.
 
4 हलके सुती कपडे-
ट्रेकिंगसाठी हलका टी-शर्ट किंवा सुती कपडे, टॉवेल इ. ठेवा. उन्हाळ्यात ट्रेकिंग करताना खूप घाम येतो. वारंवार घाम येत असल्यास, आपण टॉवेल किंवा सूती कापडाने चेहरा किंवा शरीर पुसून टाकू शकता.