1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)

आरोग्यवर्धक खजुराचे लाडू रेसिपी

Dates Ladoo recipe
साहित्य-
एक कप खजूर बिया काढलेले 
अर्धा कप मिक्स ड्रायफुट्स बादाम, काजू, अक्रोड 
1/4 कप देशी तूप 
अर्धा छोटा चमचा देशी तूप 
एक चमचा तीळ 
 
कृती-
सर्वात आधी एक पॅन घेऊन त्यामध्ये तूप गरम करावे. आता त्यामध्ये काजू, बदाम आन अक्रोड तुकडे करून भाजून घ्यावे. हे भाजलेले ड्रायफ्रूट काढून घ्यावे.  आता त्याच पॅनमध्ये खजूर घालून शिजवून घ्यावे. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. जर मिश्रण खूपच घट्ट झाले तर त्यामध्ये अगदीच थोडेसे पाणी घालावे. आता यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालावी. व मिक्स करून घ्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले  आरोग्यवर्धक खजुराचे लाडू रेसिपी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik