पेरूचा हलवा रेसिपी
साहित्य-
अर्धा किलो -पेरू
एक कप -कंडेन्स्ड मिल्क
एक टीस्पून -किसलेला पिस्ता
दोन चमचे -तूप
३० ग्रॅम -खवा
कृती-
सर्वात आधी पेरू सोलून घ्यावे. नंतर त्यामधील बिया काढून टाकाव्या. आता ब्लेंडरमध्ये बारीक करा. आता गॅसवर पॅन ठेऊन पेरूची प्युरी शिजवून घ्यावी. तसेच तूप घालून कमीतकमी दोन मिनिटे शिजवावे. आता त्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क आणि खवा घालावा. तसेच हलवा तपकिरी होईपर्यंत मोठ्या आचेवर शिजवा. आता चिरलेले काजू, बदाम आणि पिस्त्याची काप घालावे. तर चला तयार आहे आपला पेरूचा हलवा रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik