शुक्रवार, 27 जानेवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated: सोमवार, 12 ऑक्टोबर 2020 (10:41 IST)

Banana Cake पिकलेल्या केळीचा केक

बऱ्याच वेळी केळी जास्त दिवस ठेऊन काळपटतात. खूप जास्त पिकतात. त्यांना खावंसं देखील वाटत नाही आणि आपण त्यांना घराच्या बाहेर टाकून देतो. पण बऱ्याच वेळा असे दिसून येत की बाहेरून जास्त पिकलेले किंवा खराब झालेली केळी आतून चांगले असतात. तरी ही त्यांना कोणीही खात नाही फेकून देतात. तर आपल्या घरात देखील जास्त पिकलेली केळी असल्यास त्यांना फेकुन देऊ नका ही रेसिपी करून बघा. आपल्या मुलांना ही नक्कीच आवडेल आणि वस्तू पण वाया जाणार नाही. 
 
आपण यापासून चविष्ट असे केक देखील बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊया. 
 
साहित्य - 
2 पिकलेली केळी, 1 कप रवा, 2लहान चमचे दही, 2 लहान चमचे तेल, 1 चमचा बॅकिंग सोडा, साखर चवीपुरती, 1/2 चमचा वेलची पूड, टूटी-फ्रुटी.
 
कृती - 
पिकलेल्या केळीचे साल काढून त्यांना कुस्करून घ्या. एका भांड्यात रवा घेऊन त्यामध्ये दही मिसळा. आपली इच्छा असल्यास आपण रवाच्या जागी मैदा किंवा गव्हाचं पीठ देखील घेउ शकता. रवा आणि दह्याचा मिश्रणात तेल मिसळा. आपण तेलाच्या ऐवजी साजूक तूप किंवा लोणी देखील घालू शकता. 
 
या मध्ये थोडी साखर मिसळा. साखर कमीच घाला कारण केळ मुळातच गोड असतं. 
 
दही,रवा आणि तेलाच्या या मिश्रणात चांगली चव देण्यासाठी आपण वेलचीपूड वापरावी. आता याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या. या मिश्रणात कुस्करलेलं केळ घाला. आणि फेणून या मध्ये टूटी- फ्रुटी टाका. 15 मिनिट तसेच ठेवावं. जेणे करून रवा या मध्ये चांगल्या प्रकारे मिसळून जावो. आता या मिश्रणात बॅकिंग सोडा घालून फेणून घ्या.
 
आता एका जाडसर कढईत मीठ घालून गरम होण्यासाठी गॅस वर तापवायला ठेवा. आता केक च्या भांड्यात तूप किंवा लोणी लावून मिश्रण भांड्यात ओतून घ्या आणि त्याला एकदा सेट करा. आता गरम केलेल्या कढईत तो साचा ठेवून अर्ध्या तासाला मंद गॅस वर ठेवा. 
 
अर्ध्या तासानंतर त्या केकच्या मध्ये एक सूरी टाकून बघा जर मिश्रण सुरीला चिटकत असेल तर 10 मिनिटासाठी परत ठेवा. आता परत सूरी टाकून बघा जर मिश्रण चिटकत नसेल तर ह्याचा अर्थ की आपला केक तयार आहे. थंड झाल्यावर एका ताटलीत साच्यातून केक पालटून काढून घ्या, आणि चविष्ट केळीचे केक खाण्यासाठी तयार.