1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : रविवार, 5 मार्च 2023 (17:55 IST)

प्रामाणिक महाराष्ट्रीयन करंजी रेसिपी

Maharashtrian Karanji Recipe
साहित्य: एक वाटी मैदा, 1 वाटी बारीक किसलेले सुके खोबरे, 1 वाटी पिठीसाखर, अर्धा वाटी तूप मोयनसाठी, तळण्यासाठी तूप, आवश्यकतेप्रमाणे सुखे मेवे, अर्धा लहान चमचा खसखस आणि वेलची पूड
 
करंजीचे सारण
करंजी तयार करण्यासाठी सर्वात आधी स्टफिंग तयार करा. एक नॉन स्टिक पॅन गरम करा त्यात नारळबुरा किवा किसलेलं नारळ मध्यम आचेवर एक ते दोन मिनिटे परतून घ्या. एका वाटीत काढून घ्या. आता पॅनमध्ये तुप गरम करा, रवा मिसळा आणि चार ते पाच मिनिटे भाजून घ्या. त्यात खसखस आणि ड्राय फ्रूट्स मिसळून परतून घ्या. भाजलेला नारळबुरा किंवा किसलेलं नारळ मिसळून एक मिनिट भाजून घ्या. हे सर्व मिश्रण एका वाडग्यात ठेवून15 मिनिटे गार होण्यासाठी बाजूला ठेवा. आता यात सारख आणि वेलचीपूड घालून मिसळून घ्या.
 
करंजीचे पीठ
बाउलमध्ये एक वाटी मैदा त्यात अर्धा वाटी तूप घालून नीट एकत्र करून घ्या. आता पिठामध्ये थोडं-थोडं कोमट पाणी ओतून पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने ते थोड्या वेळासाठी झाकून ठेवा.
 
पिठाचे छोटे- छोटे गोळे तयार करून लहान-लहान पुरीसारखे लाटून घ्या. लाटलेली पुरीमध्ये सारख भरुन त्याला नीट बंद करा किंवा करंजी मेकरमध्ये पुरी ठेवून त्यात सारण भरा. करंजी फुटू नये यासाठी पुरीच्या कडेवर थोडेसे पाणी लावा.
 
कढईमध्ये तूप गरम करा. त्यात करंजी तळून घ्या.