1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated: गुरूवार, 26 जानेवारी 2023 (10:00 IST)

वसंत पंचमी निमित्त तयार करा केशरी भात

saffron rice
सामुग्री: 100 ग्राम उच्च गुणवत्तेचे तांदूळ, 100 ग्राम साखर, 1 चमचा केशरी रंग किंवा केशर दूधात भिजवून, 5 चमचे तूप, काजू, बदाम, सुके मेवे आवडीप्रमाणे, 1 कप ओला नारळाचा खोवलेला चव, 1/2 लिंबू, 5 लवंगा, वेलदोडा पूड
 
कृती: तांदूळ धुवून घ्यावे. पातेलीत तूप घालून लंगा परतून घ्यावा. त्यात तांदूळ घालावे. मोकळा भात करून घ्यावा. दुसऱ्या पातेलीत साखर, एक वाटी पाणी, खोबरे, केसर घालून शिजवून एक तारी पाक तया करावा आणि भातावर ओतावा. भाताला पुन्हां एक वाफ देऊन लिबाचा रस घालावा. नंतर सुके मेवे घालून सर्व्ह करावा.