शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By

Gazar Halwa Recipe : या सोप्या पद्धतीने घरीच बनवा गाजर हलवा

हिवाळा हंगाम आला आहे. या हंगामात अनेक भाज्या बाजारात येतात. हिवाळ्यात, हंगामी भाज्यांसोबत, स्वयंपाकघरात विविध प्रकारचे पदार्थ देखील तयार केले जातात. हे पदार्थ खायला चविष्ट तसेच आरोग्यदायी असू शकतात. बहुतेकदा हिवाळ्यात मिठाईमध्ये एक विशेष पदार्थ बनविला जातो, जो सामान्यतः उन्हाळ्याच्या हंगामात मिळत नाही. हिवाळ्यात भाजीबाजारात गाजर येतात आणि लोकांच्या स्वयंपाकघरातून गाजर हलव्याचा वास येऊ लागतो . प्रयत्न करून देखील  अनेकांना गाजराचा हलवा बनवता येत नाही. गाजराचा हलवा करण्याची सोपी पद्धत जाणून घ्या .
 
साहित्य-
एक किलो गाजर, एक लिटर मलई दूध, 1/4 कप मावा, 2 कप साखर, 3 मोठे चमचे साजूक तूप, बदाम, काजू, बेदाणे.
 
कृती- 
गाजर नीट धुवून किसून घ्या. कढईत तूप गरम करा.नंतर त्यात किसलेले गाजर घालून झाकून ठेवा आणि मंद आचेवर शिजू द्या. गाजर शिजल्यावर त्यात दूध घालून मिक्स करा.आता साधारण 20-25 मिनिटे शिजू द्या.
दूध आटल्यावर त्यात मावा आणि साखर घालून काही मिनिटे शिजवा. मधून मधून ढवळत राहा. पाणी सुकेपर्यंत परतून घ्या.त्यावर थोडं तूप घाला. हलवा जितका जास्त शिजवाल तितकी चव वाढते. आता गॅस बंद करून त्यावर ड्रायफ्रुट्स घालून मिक्स करा. चविष्ट गाजराचा हलवा तयार आहे. गरम हलवा सर्व्ह करा.
 
Edited By - Priya Dixit