Nagpanchami Naivedyam Recipe नागपंचमीच्या दिवशी बनवा पारंपरिक नैवेद्य
नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात मुख्यत्वे तवा किंवा कढईत न तळता वाफेवर शिजवलेले पदार्थ बनवले जातात.
उकडीचे कानवले (दिंड / कानोले)
साहित्य- १ कप गव्हाचे पीठ, १/२ कप चणा डाळ, १/२ कप गूळ, वेलची पूड, जायफळ, १ चमचा तूप.
कृती-
१. चणा डाळ शिजवून घेऊन ती गुळात आटवून पुरण तयार करा. त्यात वेलची-जायफळ पूड घाला.
२. गव्हाच्या पिठात थोडे तूप आणि मीठ घालून घट्ट भिजवून घ्या.
३. पिठाची बारीक पोळी लाटून त्यात मध्यभागी पुरण भरा आणि करंजीसारखा किंवा घडीचा आकार देऊन कडा बंद करा.
४. हे कानवले चाळणीवर ठेवून १० ते १२ मिनिटे वाफेवर शिजवून घ्या. गरम तुपासोबत सर्व्ह करा.
गव्हाची खीर
साहित्य- १ कप साल काढलेला गव्हाचा भरडा (किंवा दलिया), १ कप गूळ, ३ कप दूध, ओल्या नारळाचा चव, ड्रायफ्रूट्स, वेलची पूड, २ चमचे तूप.
कृती-
१. कुकरमध्ये तूप गरम करून गव्हाचा भरडा हलका भाजून घ्या. त्यात पाणी घालून ३-४ शिट्ट्या काढून शिजवून घ्या.
२. शिजलेल्या गव्हामध्ये गूळ, ओला नारळ आणि थोडे दूध घालून ५ मिनिटे मंद आचेवर उकळा.
३. गूळ पूर्ण वितळल्यावर उरलेले दूध, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड घालून ५ मिनिटे शिजू द्या.
तांदळाची उकड / पातोळ्या (हळदीच्या पानावरील)
साहित्य- १ कप तांदळाचे पीठ, १ कप ओला नारळ, १/२ कप गूळ, हळदीची पाने, वेलची पूड.
कृती-
१. नारळ आणि गूळ एकत्र परतून सारण तयार करा.
२. गरम पाण्यात थोडे मीठ आणि तूप घालून तांदळाच्या पिठाची मऊ उकड काढून घ्या.
३. हळदीच्या पानाला थोडे तूप लावून त्यावर तांदळाची उकड थापा. मध्यभागी नारळ-गुळाचे सारण भरून पान दुमडा.
४. वाफवण्याच्या भांड्यात १० ते १५ मिनिटे शिजवून घ्या.
नागपंचमीला अनेक ठिकाणी तवा चढवणे किंवा तळणे निषिद्ध मानले जात असल्याने हे सर्व प्रकार वाफेवर बनवले जातात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Nagpanchami Recipe नागपंचमी रेसिपी दाल बाफला
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: नागपंचमीच्या दिवशी तवा चुलीवर का ठेवत नाहीत? जाणून घ्या यामागील पौराणिक आणि शास्त्रीय कथा
