1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
  4. Narali Purnima Special Narali Bhat

नारळी पौर्णिमा स्पेशल शाही नारळी भात: साजूक तूप आणि केशर-वेलचीचा सुवास!

साहित्य
तांदूळ: १ कप
ओला नारळ: १ कप (खोवलेला)
गुळ किंवा साखर: ३/४ कप (बारीक चिरलेला गूळ)
साजूक तूप: २-३ मोठे चमचे
खडे मसाले: २ लवंगा, २ हिरवी वेलची, १ छोटा तुकडा दालचिनी
ड्रायफूट्स: काजू, बदाम आणि मनुके (आवडीनुसार)
इतर: १/४ चमचा वेलची-जयफळ पूड, चिमूटभर केशर (दूधात भिजवलेले), चिमूटभर मीठ
 
कृती
भाताची तयारी: तांदूळ स्वच्छ धुवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा. त्यानंतर कढईत किंवा कुकरमध्ये १ चमचा तूप गरम करून लवंग, वेलची आणि दालचिनी परता. त्यात धुवलेले तांदूळ घालून १-२ मिनिटे हलक्या हाताने परतून घ्या.
 
भात शिजवणे: १ कप तांदळासाठी पौणेदोन ते दोन कप पाणी घालून भात शिजवून घ्या. (भात ९०% शिजलेला असावा आणि मोकळा-मोकळा/सुटसुटीत असावा).
 
ड्रायफूट्स तळणे: एका वेगळ्या कढईत उरलेले साजूक तूप गरम करून त्यात काजू, बदाम आणि मनुके हलके सोनेरी होईपर्यंत तळून बाजूला काढा.
 
मिश्रण एकजीव करणे: त्याच कढईत खोवलेला ओला नारळ आणि गूळ (किंवा साखर) एकत्र करून मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत हलवा.
 
नारळी भात तयार करणे: गूळ विरघळल्यावर त्यात शिजवलेला मोकळा भात, केशरचे दूध आणि चिमूटभर मीठ हलक्या हाताने मिक्स करा (तांदळाचे दाणे मोडणार नाहीत याची काळजी घ्या).
 
वाफ काढणे: कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे छान वाफ काढून घ्या, जेणेकरून गुळाचा आणि नारळाचा गोडवा भातात छान मुरेल.
 
सजावट: शेवटी वेलची-जयफळ पूड आणि तळून घेतलेले ड्रायफूट्स वरून घालून गॅस बंद करा.
 
गरमागरम आणि साजूक तुपाची धार सोडून हा नारळी भात सर्व्ह करा!
पुढील लेख
Narali Purnima 2026 Wishes in Marathi नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा