शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (11:30 IST)

लाल भोपळ्याची बर्फी

साहित्य - 
1 किलो लाल भोपळा ज्याला कद्दू देखील बरीच लोकं म्हणतात, 4 चमचे साजूक तूप, 250 ग्रॅम साखर, वेलची पूड, 250 ग्रॅम मावा किंवा खवा, बदाम कापलेले, काजू कापलेले, पिस्ते कापलेले.
 
कृती - 
सर्वप्रथम भोपळ्याला धुऊन सोलून घ्या. याचे बियाणं काढून घ्या. या भोपळ्याला किसून घ्या. एका कढईत तूप गरम करून त्या तुपात किसलेला भोपळा टाकून वरून झाकण लावून शिजवा. एकदा मिसळून परत मध्यम आचेवर शिजवून घ्या. भोपळा शिजल्यावर त्यामध्ये साखर मिसळून द्या. आपण बघाल की साखर वितळल्यावर पाणी सुटेल. आपल्याला एक सारखे ढवळायचे आहे जो पर्यंत त्यामधील पाणी आटत नाही. आता उर्वरित तूप घालून ढवळून घ्या. 
 
या नंतर खवा आणि सर्व सुके मेवे काढलेले घालून ढवळावे. जो पर्यंत हे सारण घट्ट होत नाही. घट्ट झाल्यावर हे झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी याला बोटांवर घेऊन बघा. आपणास दोन्ही बोटांच्या मध्ये तार दिसत असल्यास समजावं की हे झाले आहे. या मध्ये वेलची पावडर घाला. गॅस बंद करा. आता एका मोठ्या ताटात तूप लावून त्यावर हे सारण पसरवून द्या. थोडं थंड झाल्यावर सुरीने बर्फीचा आकार द्या. चविष्ट अशी लाल भोपळ्याची बर्फी खाण्यासाठी तयार.