Vastu tips for success in life लहानश्या या सवयी आयुष्य बदलतील
* बसताना नेहमी उत्तर किंवा पूर्वीकडे तोंड करून बसावे.
* एका ग्लासात पाणी घेऊन त्यामध्ये थोडी हळद टाकून आंब्याच्या किंवा नागलीच्या पानाने हे पाणी घरात शिंपडावे. टीव्हीच्या काचेत किंवा आरशाची सावली शयनकक्षात पडू देऊ नये.
* घरात तुटलेला काच ठेवू नये.
* एक बादली पाण्यात 5 चमचे मीठ घालून घराची फर्शी पुसावी.
* डायनिंग टेबल किंवा जेवणाचे टेबल गोलाकार नसावे.
* अर्धा किलो तुरटी ड्रॉईंग रूम किंवा बैठकीत ठेवावी.
* मुख्य दार कमानीचे नसावे.
* मुख्य दाराच्या पडद्याला घुंगरू बांधणे शुभ आहे.
* मुख्य दारावरील बाजूस बाहेर आणि आत गणपतीचे चित्र लावावे.
* उत्तर दिशेला मारुतीचा आशीर्वादच्या मुद्रेचा फोटो लावा.
* कोणाला ही भेटवस्तू म्हणून घड्याळ देऊ किंवा घेऊ नका.
* कपाळी कुंकू किंवा टिळा लावावे.
* अवसेच्या दिवशी संध्याकाळी गोरज काळी उंबऱ्याच्या बाहेर स्वच्छ करून स्वस्तिक बनवून पूजा करावी आणि नारळ फोडून बाहेर फेकावे.