- लाईफस्टाईल
- खाद्य संस्कृती
- शाकाहारी
कॉर्न साबूदाणा बॉल्स
साहित्य : दोन मक्याची कणसे, दोन उकडलेले बटाटे, एक वाटी भिजविलेला साबूदाणा, एक चमचा जिरे, थोडी चिरलेली कोथिंबीर, पाऊण वाटी दाण्याचे कूट, 2-3 चमचे हिरवी मिरची पेस्ट. चवीनुसार मीठ, साखर, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे साजूक तूप.
कृती : सर्वप्रथम कणसे बारीक किसणीने किसून घ्यावीत किंवा त्याचे दाणे काढून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. बटाटे सोलून किसून घ्यावेत. भिजलेल्या साबूदाण्यात बटाट्याचा कीस, जिरे, दाण्याचे कूट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, साजूक तूप, मीठ साखर, लिंबाचा रस, किसलेली कण से घालावीत. मिश्रण चांगले एकजीव करावे व लहान लहान बॉल्स बनवून तेलात तळून घ्यावेत. हे बॉल्स खोबर्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.