मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified बुधवार, 30 जून 2021 (21:36 IST)

चविष्ट कॉर्न सूप

पावसाळ्यात कॉर्न सूप पिण्याच्या मज्जाच काही और आहे.आरोग्याच्या दृष्टीने देखील हे चांगले आहे.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून  घेऊ या.
 
साहित्य-
 
1 वाटी मक्याच्या कणसाचे दाणे ,1 गाजर,1 कांदा,2 चमचे मैदा,50 ग्रॅम बटर,1/2 चमचा काळी मिरपूड,मीठ चवी प्रमाणे,थोडंसं व्हिनेगर.
 
कृती- 
 
मक्याचे दाणे काढून उकळवून घ्या आणि मिक्सरमध्ये घालून वाटून पेस्ट बनवा. आता पॅनमध्ये गाजर आणि कांदा बारीक चिरून शिजवून घ्या.भाज्या शिजल्यावर त्यात मक्याच्या दाण्याची पेस्ट घालून शिजवून घ्या.थोडंस मीठ आणि व्हिनेगर घाला.वेगळ्याने पाणी उकळवून घ्या.हे पाणी मिक्स केलेल्या भाज्यात घाला आणि 2 चमचे मैदा मिसळा.वरून काळी मिरीपूड,आणि बटर घाला आणि थोड्यावेळ शिजू द्या.सर्व जिन्नस मिसळल्यावर गॅस बंद करून द्या गरम सूप पिण्यासाठी सर्व्ह करा.