शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified सोमवार, 17 मे 2021 (19:29 IST)

आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर

साहित्य- 
250 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम मसूरडाळ, 1 कप दूध, 50 ग्रॅम क्रीम, 1 कांदा, 1 चमचा बटर, 1 चमचा साजूक तूप, 1 चमचा मीठ.
 
कृती -
सर्वप्रथम एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या.त्यात बारीक चिरलेला कांदा घालून हलकं 5 मिनिटे परतून घ्या. गाजर किसून घाला . मसुराची डाळ धुवून परतून घाला. या मध्ये 8 कप पाणी आणि मीठ घाला. डाळ शिजल्यावर गॅस वरून काढून घ्या.सूप तयार.
आता एका कढईत बटर गरम करून त्यात सूप घाला. उकळी आल्यावर दूध मिसळा आणि ढवळून घ्या. सूप तयार आहे. सर्व्ह करताना प्रत्येक वाटीत थोडं - थोडं क्रीम फेणून घाला आणि सर्व्ह करा.