शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By
Last Modified: रविवार, 20 जून 2021 (18:05 IST)

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा

पावसाळा आपल्या बरोबर आजार घेऊन येतो,सर्दी ,पडसं,खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग प्रतिकारक क्षमता बळकट केली तर रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. या साठी आले पाक वडी बनवा. जेणे करून याचा सेवनाने रोग प्रतिकारक शक्ती बळकट होईल.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून  घ्या.
 
साहित्य- 
200 ग्राम आलं,300 ग्राम साखर,2 चमचे साजूक तूप,10 वेलची,2 चमचे दूध,
 
कृती- 
सर्वप्रथम आलं घ्या आणि त्याला मिक्सरमध्ये दूध घालून वाटून पेस्ट बनवा.एका पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करा आणि आल्याची पेस्ट घालून द्या.5 मिनिट मध्यम आचेवर हलवा.या मध्ये साखर आणि वेलची पूड करून घाला,एका ताटलीत बटर पेपर लावा आणि त्यावर थोडा तुपाचा हात लावा. मिश्रण पॅनमध्ये घट्ट झाल्यावर गॅस बंद करून द्या आणि मिश्रण ताटलीत पसरवून द्या.मिश्रण थंड झाल्यावर सुरीने वडी कापून घ्या.आलेपाक वडी तयार आहे.ही वडी एका डब्यात ठेवा 2 महिने ही खराब होणार नाही.