सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

Recipe : मेथी मटर मलाई

साहित्य: 200 ग्रॅम निवडलेली मेथी, 150 ग्रॅम मटार (वाफवलेले), 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1-1 चमचा आलं, लसूण पेस्ट, अर्धा कप फेटलेलं दही किंवा टोमॅटो प्युरी, 1 चमचा तेल, मीठ, दीड चमचा तिखट, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा कप क्रीम, 2 चमचे लोणी.


कृती: तेल गरम करून कांदा गुलाबी करा. आलं, लसूण पेस्ट, मेथी चिरून घाला व खूप परता. तिखट, धनेपूड, जिरेपूड, मीठ, टोमॅटो प्युरी, वाफवलेला मटार घालून परता. क्रीम घालून परता. वर लोणी घालून गॅस बंद करा. ही भाजी मेथीमुळे हिरवी दिसते व खमंग लागते.