Marathi Biodata Maker
✕

Paneer Manchurian Recipe लज्जतदार चायनीज पद्धतीची डिश ''पनीर मंचुरियन''

Updated: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026 (15:10 IST)
ग्रेव्ही/सॉससाठी:
लसूण – १ मोठा चमचा (बारीक चिरलेला)
आलं – १ छोटा चमचा (बारीक चिरलेले)
हिरवी मिरची – २ (बारीक चिरलेल्या)
कांदा – १ (चौकोनी तुकडे किंवा बारीक चिरलेला)
शिमला मिरची – १ (चौकोनी तुकडे)
कांद्याची पात – २-३ चमचे (चिरलेली)
सोया सॉस – १ ते १.५ मोठा चमचा
रेड चिली सॉस – १ मोठा चमचा
टोमॅटो केचप – १ मोठा चमचा
सिरका – १ छोटा चमचा
कॉर्नफ्लॉवर स्लरी – १ मोठा चमचा कॉर्नफ्लॉवर २-३ चमचे पाण्यात मिसळून
काळी मिरी पूड – ½ छोटा चमचा
तेल – २ मोठे चमचे
मीठ – चवीनुसार (सॉसमध्ये मीठ असते, त्यामुळे बेताने घालावे)
ALSO READ: चायनीज-स्टार्टर्समधील सर्वात लोकप्रिय पदार्थ Crispy Honey Chilli Potato
कृती-
एका बाऊलमध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट आणि मीठ घ्या. थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट सरबरीत पीठ (बॅटर) तयार करा. यात पनीरचे तुकडे घालून नीट कोटींग करून घ्या.
कढईत तेल गरम करून पनीरचे तुकडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून बाजूला ठेवा. आता दुसऱ्या कढईत २ मोठे चमचे तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण, आलं आणि हिरवी मिरची घालून हाय फ्लेमवर (मोठ्या आचेवर) १ मिनिट परता. आता त्यात कांदा आणि शिमला मिरची घालून १-२ मिनिटे परता (भाज्या जास्त शिजवू नका, त्या कुरकुरीत राहिल्या पाहिजेत). त्यात सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, सिरका, काळी मिरी पूड आणि थोडे मीठ घालून एकत्र करा. आता तयार केलेली कॉर्नफ्लॉवर स्लरी घाला आणि सॉस घट्ट होईपर्यंत परता. (ड्राय मंचुरियन हवे असल्यास पाणी घालू नका; ग्रेव्ही मंचुरियन हवे असल्यास ½ कप पाणी घालून उकळी आणा). सॉस छान शिजल्यावर त्यात तळलेले पनीरचे तुकडे आणि कांद्याची पात घालून हलक्या हाताने मिक्स करा.गरमागरम पनीर मंचुरियन सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून थोडी कांद्याची पात भुरभुरा आणि सर्व्ह करा!
ALSO READ: चायनीज ट्विस्ट, मसालेदार आणि चटपटीत शेजवान पोहा एकदा नक्की चाखून बघा
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उरलेल्या भाताची भन्नाट मंचुरियन राईस; बोटं चाटायला लावणारी झटपट रेसिपी

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

Popular Marathi Boy Names मुलांची २५ लोकप्रिय मराठी नावे

Healthy Dining Options रेस्टॉरंटमध्ये खाऊनही वजन नियंत्रणात ठेवा; हे ७ पर्याय ठरतील उत्तम!

सततच्या स्क्रीन टाईममुळे डोळे थकतात? रोज फक्त ५ मिनिटे करा हे सोपे डोळ्यांचे व्यायाम

नवरात्रीच्या उपवासासाठी साबुदाणा खिचडीपेक्षा वेगळे ७ पदार्थ; झटपट तयार होतील या रेसिपी

नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणाऱ्या महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी

पुढील लेख
Show comments