गव्हाच्या पिठाचे गोलगप्पे चटकन बनवा
गोलगप्पे सर्वानाच आवडतात आपण घरात देखील हे सहज बनवू शकतात. चला तर मग जाणून घेऊ या साहित्य आणि कृती .
साहित्य-
गव्हाचं पीठ, रवा, तेल, मीठ.
कृती -
सर्वप्रथम गव्हाचं पीठ,रवा, मीठ, तेल चांगल्या प्रकारे मिसळून घ्या.हे सर्व जिन्नस हाताने चोळून घ्या.असं केल्यानं तेल चांगल्या प्रकारे मुरेल.या मध्ये पाणी मिसळा.लागत लागत पाणी घालून कणीक मळून घ्या. 20 मिनिटे झाकून ठेवा.नंतर पुन्हा मळून घ्या. असं केल्यानं कणीक मऊसर आणि गुळगुळीत होईल.या कणकेच्या लहान लहान गोळ्या बनवा नंतर या लाट्या किंवा गोळे लाटून घ्या आणि छोट्या पुऱ्या बनवा. ओलसर कापड्यानं झाकून ठेवा. नंतर कढईत तेल तापत ठेवा आणि या पुऱ्या तळून घ्या.गोलगप्पे खाण्यासाठी तयार.