मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. महिला दिन
Written By वेबदुनिया|

व्यक्त होण्याचा हा प्रवास

प्रमिला ज. देशपांडे

ND
किती एक वर्षांपूर्वी,
याच दिवसात
कुणाच्या तरी आत
होते मी धडपडत
बाहेर पडण्यासाठी

किती एक वर्षांनंतर,
आता याच दिवसात
आहे मी धडपडत
माझ्यातूनच मला बाहेर
काढण्यासाठी

अव्यक्त
व्यक्त होण्याचा हा प्रवास
निरखित निवान्तपणे-
तृप्त मी, मुक्त मी !
बसेन कदाचित्
किती एक वर्षांनंतर !