अमिताभही बंदूक घेऊन झोपले
मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर शहरात दहशत पसरली असून, बिग बीही रात्री उशासी बंदूक बाळगून झोपले. आपल्या आयुष्यात प्रथम आपण असे केले असून, दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर आपण आपल्या उशासी बंदूक घेऊन झोपल्याचे बिग बीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. बुधवारी ज्या दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला चढवला तेव्हा दिवंगत हरिवंशराय बच्चन यांची जयंती होती. यादिवशी अमिताभ यांनी दिवसभर टीव्ही पाहण्यात घालवला. यानंतर रात्री उशिरा झोपताना अमिताभ यांनी आपल्या उशासी बंदूक घेतली होती. आपल्याला या रात्री झोप न लागल्याचे अमिताभ यांनी यात नमूद केले आहे.