शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By भाषा|
Last Modified: येरूशलेम , सोमवार, 3 मे 2010 (15:34 IST)

इस्त्राईलला भारताचा नकार

मुंबईतील दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी इस्त्राईलने आपले कमांडो पाठवण्याची तयार दाखवली होती, परंतु भारत सरकारने याला स्पष्ट शब्दात नकार दिला असून, भारतीय लष्कर यासाठी सक्षम असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

इस्त्राईलमधील वर्तमान पत्रांनी याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या असून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रकाशित केली आहे.

यानंतर इस्त्राईली सैन्याने आपले कमांडो पाठवण्याची तयारी दर्शवली होती. इस्त्राईली लष्कराने तर आपल्या कमांडोंना भारतात पाठवण्याची तयारीही पूर्ण केली होती़ परंतु भारत सरकारने स्पष्ट शब्दात याला नकार दिल्याने इस्त्राईलने आपल्या कमांडोना पाठवण्याचा निर्णय मागे घेतला.