शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (15:40 IST)

ताजमध्ये अर्धा डझन दहशतवादी?

मुंबईतील हॉटेल ताजमध्ये अजूनही कमांडो कारवाई सुरूच असून, 48 तास लोटल्यानंतरही दहशतवादांच्या सफाया न झाल्याने आता भारतीय लष्करानेही चिंता व्यक्त केली आहे. ताजमध्ये अजूनही अर्धाडझन दहशतवादी लपले असल्याचा संशय लष्कराला असून, अजूनही ताजमध्ये दहशतवादी आणि एनएसजी कमांडोत चकमक सुरूच आहे.

ताजच्या बाहेर आज सकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार करत पत्रकारांवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर सायंकाळपर्यंत दहशतवादी मारले गेल्याचे बोलले जात असतानाच अचानक दुपारनंतर दहशतवाद्यांनी पुन्हा ताजमधून जोरदार गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी याला जोरदार उत्तर दिले.

सायंकाळी लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी ताजमध्ये एक पेक्षा अधिक दहशतवादी लपल्याची भीती व्यक्त केली असून, हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत जवान अणी दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच होती.