शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By भाषा|

मुंबईत नौदलाची नवीन रणनीती

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांना चोख उत्तर देण्यासाठी नौदलाने प्रथमच नवीन रणनीती आखल्याचे स्पष्ट केले आहे.

यापूर्वी नौदलाने जम्मूत अशा स्वरूपाची कारवाई केली होती. परंतु मुंबई सारख्या घनदाट लोकवस्ती आणि उंचच उंच इमारती असलेल्या भागात प्रथमच नौदलाने कमांडोंना उतरवले असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे.

आज नौदलाने मुंबईतील नरिमन हाउसवर कमांडोंचे पथक उतरवले. यात हाय पॉवरच्या तारांच्या तारांचा सामनाही नौदलाला करावा लागला.
विंग कमांडर महेश उपासनी यांच्या नेतृत्वाखाली आज नौदलाने ही कारवाई केली.