शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

आता अंतिम लढाईसाठी तयार रहाः पंतप्रधान

पाकिस्‍तानला दिली ताकीद

देशाच्‍या सार्वभौमत्‍वावर हल्‍ला करणा-यांना आम्‍ही सोडणार नाही. दहशतवादाविरुध्‍दची लढाई आता अंतिम टप्‍प्‍यात आली असून देशातील जनतेने त्‍यासाठी तयार रहावे. शेजारच्‍या देशाने आता या संदर्भात निश्चित धोरण स्‍पष्‍ट करून दहशतवादी कारवायांसाठी आपल्‍या भूमीचा वापर करणा-यांना रोखण्‍यासाठी त्‍वरित पावले उचलावीत, अशी ताकीद पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी दिली आहे

राष्‍ट्राला संबोधित करताना ते म्‍हणाले, की दहशतवाद्यांनी देशाची अर्थव्‍यवस्‍था मोडकळीस आणण्‍यासाठी मुंबईवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांचा हा प्रयत्‍न हाणून पाडण्‍यासाठी आमच्‍या पोलीस दलाच्‍या ज्‍या शूर जवानांनी प्राणांची आहुती दिली त्‍यांच्‍या शौर्याला आमचा सलाम. देशात कायदा व सुव्‍यवस्‍था बहाल करण्‍यासाठी आणि जनतेच्‍या सुरक्षेसाठी आम्‍ही सर्वतोपरी प्रयत्‍न करणार आहोत. दहशतवादाचा खात्‍मा करण्‍यासाठी आता सर्वांनी तयार राहण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.