ओबेरॉयच्या टिफीन्समध्ये मृत्यूचे तांडव
हॉटेल ओबेरॉयमध्ये दहशतवाद्यांनी मृत्युचे तांडव माजविले असून ओबेरॉयमधील टिफीन्स रेस्तरॉंमध्ये अंधाधुंद गोळीबार केला आहे. त्यात कुणीही जीवंत राहु शकले नसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 40 तासांपासून सुरू असलेल्या या मृत्युच्या तांडवात लहान मुलांनाही अतिशय अमानुषपणे ठार केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मृतांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या हॉटेलमध्ये मृतदेहांचा खच पडला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यास पोलीस सुत्रांकडून माहिती मिळू शकली नाही.