शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वार्ता|
Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (15:23 IST)

दहशतवाद्यांविरोधात कडक कायदा हवाच- अडवाणी

देशात वाढत्या दहशतवादी कारवायांनंतरही सरकारचे डोळे उघडले नसल्याची टीका करत दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी देशात दहशतवादाविरोधात कडक कायद्याची गरज भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे.

आज अडवाणींनी मुंबईतील घटनास्थळांना भेट दिली. यानंतर अडवाणींनी सरकारवर टीकेची झोड उडवली. कॉग्रेस सरकारनेच देशातील पोटा सारखा दहशतवादी कायदा रद्द केल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे वाढल्याचे अडवाणी म्हणाले.