शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. मुंबईतली काळरात्र
Written By वेबदुनिया|

नरीमनमध्‍ये ऑपरेशन 'टॉप टू बॉटम' सुरू

मुंबईतील नरीमन हाऊसमध्‍ये अडकून पडलेल्‍या ओलिसांच्‍या सुटकेसाठी विंग कमांडर विकास शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखालील तटरक्षक दलाच्‍या कमांडोंनी आणि एनएसजीच्‍या जवानांनी दहशतवाद्यांविरुध्‍दचे ऑपरेशन तीव्र केले असून दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यासाठी आता केवळ काही तास वाट पहावी लागणार आहे.

दरम्‍यान दहशतवाद्यांच्‍या तावडीतून ताज मुक्‍त करण्‍यात यश आले आहे. मात्र नरीमन हाऊसमध्‍ये कारवाई सुरूच असून अंतिम टप्‍प्‍यात आहे. पहाटेच तटरक्षक दलाच्‍या हेलिकॉप्‍टरने कमांडोंना उतरविण्‍यात आले होते. तेव्‍हा पासून दोन्‍ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू असून दहशतवाद्यांनी केलेल्‍या ग्रेनेड हल्‍ल्‍यात एक कमांडोही जखमी झाला आहे.

ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये अजूनही कोंबिंग ऑपरेशन सुरू असून तेथे आणखी काही दहशतवादी लपून बसल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. ताज आणि
ओबेरॉयमध्‍ये आता कुणीही ओलीस नसल्‍याची माहिती लेफ्ट.जन. एम.थंबुराजन यांनी दिली असून ओबेरॉयमधून 60 ओलिसांना मुक्‍त करण्‍यात आले आहे.


दरम्‍यान, नरीमन हाऊसमध्‍ये सुरू असलेल्‍या कारवाईत दहशतवाद्यांकडून गोळीबार व ग्रेनेडचा हल्‍ला सुरूच आहे. कारवाईला सुरूवात करताच दहशतवाद्यांनी नरीमन हाऊसमध्‍ये 50 मिनिटात तीन मोठे बॉम्‍बस्‍फोट घडवून आणले आहे.

राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महानिर्देशक जे.के. दत्ता यांनी सांगितले, की 'नरीमन हाऊसमध्‍ये दोन्‍ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू असून आतापर्यंत एक दहशतवादी ठार करण्‍यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांवर नियंत्रणासाठी आणखी काही तास लागण्‍याची शक्‍यता असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. ओबेरॉय हॉटेलच्‍या आठव्‍या मजल्‍यावर दोन दहशतवादी लपले असून त्‍यांना जीवंत पकडल्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

दहशतवाद्यांचा खत्‍मा करण्‍यासाठी जवानांनी 'टॉप टू बॉटम' ऑपरेशन
सुरू केले असून नरीमन हाऊसच्‍या छतावरून हेलिकॉप्‍टरने जवानांनी कारवाई सुरू करतानाच खालूनही दहशवाद्यांवर हल्‍ले केले जात आहेत.